शेतकरी व कामगार विरोधी कायद्याचा काँग्रेसतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 05:00 PM2020-10-02T17:00:13+5:302020-10-02T17:00:47+5:30
केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार दि. २ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले़.
उस्मानाबाद : केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार दि. २ रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आले़. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़.
आंदोलन कर्त्यांतर्फे २ ऑक्टोबर हा दिवस शेतकरी व कामगार बचाव दिवस म्हणून पाळण्यात आला़. 'शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा धिक्कार असो', 'पूर्व, पश्चित, उत्तर, दक्षिण पुरा भारत एक है, खेत किसान बचाने का इरादा हमारा नेक है', 'जय जवान, जय किसान' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला़. आंदोलनात माजी मंत्री बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष अॅड़. धीरज पाटील, विश्वासराव शिंदे, राजाभाऊ शेरखाने, अग्निवेश शिंदे आदींची उपस्थिती होती़