कळंब : लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्ताने ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमांतर्गत कळंब येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभरात एकूण १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून प्राणदानात मोलाचा सहभाग नोंदविला.
स्वातंत्र्य सेनानी, लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा उपक्रम राबवत शिबिर आयोजित केले जात आहे. यानुसार बुधवारी कळंब येथे आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, नगराध्यक्ष संजय मुंदडा, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, तहसीलदार रोहण शिंदे, नायब तहसीलदार अस्लम जमादार, राकॉ तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर, भाजप तालुका प्रमुख अजित पिंगळे, काँग्रेसचे तालुकाप्रमुख पांडुरंग कुंभार, पसचे उपसभापती गुणवंत पवार, आयएमएचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, राकाँचे प्रदेश सदस्य प्रा. डॉ. संजय कांबळे, इंडियन फार्मसी संघटनेचे प्रा. तुषार वाघमारे, सह्याद्री रक्तपेढीचे करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यानंतर विजयकुमार पवार व बाबासाहेब कोठावळे यांच्या रक्तदानाने सुरू झालेल्या या दातृत्वाच्या यज्ञाचा समारोप शंभरी पार करत अकीब पटेल यांच्या रक्तदानाने झाला. यावेळी उपरोक्त मान्यवरांनी आपल्या मनोगतात कोविडची स्थिती, माध्यमांची भूमिका यावर भाष्य करत लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला शहर व तालुकाभरातील विविधस्तरावरील मंडळींनी हजेरी लावली होती.
याशिवाय राकाँ शहराध्यक्ष मुसद्दिक काझी, पंसचे माजी उपसभापती लक्ष्मण आडसूळ, संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड, शिक्षक संघाचे जिल्हा चिटणीस राजेंद्र बिक्कड, तालुकाध्यक्ष दत्ता पवार, शिक्षक संघाचे संचालक गणेश कोठावळे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पारखे, ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष भारत सोनवणे, ऑक्सिजन ग्रुपचे हर्षद अंबुरे, चेतन कात्रे, पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, सर विश्वेश्वरय्या कन्स्ट्रक्शनचे उद्धव गपाट, स्फूर्ती फाउंडेशनचे शिवाजीराव गिड्डे पाटील, भापसेचे प्रमुख दीपकभाऊ ताटे, भाजपचे आबासाहेब रणदिवे, सतपाल बनसोडे, मकरंद पाटील, प्रदीप फरताडे, माजी अध्यक्ष शितलकुमार घोंगडे, कथले आघाडीचे सुमित बलदोटा, ॲड. मनोजकुमार थोरात, पत्रकार बालाजी निरफळ, लक्ष्मण शिंदे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष शिवाजी सिरसट, माजी नगरसेवक सुनील गायकवाड, मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष हरिभऊ शिंपले यांची उपस्थिती लाभली.
याशिवाय युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, दयावान प्रतिष्ठानचे इम्रान मुल्ला, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष विकास कदम, एसटी आगार प्रमुख मुकेश कोमटवार, कर्मचारी संघटनेचे कल्याण कुंभार, महावितरणचे सतीश गोरे, मैत्री ग्रुपचे अशोक चोंदे, शिक्षक संघटनेचे अशोक डिकले, महेंद्रकुमार रणदीवे, प्रशांत घुटे, सामाजिक कार्यकर्ते संतोष भांडे, राहुल हौसलमल, राकाँ विद्यार्थी आघाडीचे भीमा हगारे, रोटरीचे उपप्रांतपाल प्रा. संजय घुले, अध्यक्ष धर्मेंद्र शहा, अरविंद शिंदे, डॉ. गिरीश कुलकर्णी, संगणक परिचालक संघटनेचे रोहित आडसूळ, रोजगार सेवक संघटनेचे सचिन गंभिरे आदींनी शिबिरस्थळी उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रेरित केले.
सूत्रसंचालन प्राचार्य जगदीश गवळी यांनी तर प्रास्ताविक लोकमतचे उन्मेष पाटील यांनी केले. आभार लोकमतचे बालाजी अडसूळ यांनी मानले. कळंब पोलीस ठाण्याचे पोकाँ मायंदे, पोकॉ चेडे यांनी दिवसभर विशेष बंदोबस्त ठेवला होता. यशस्वितेसाठी एमएच पंचवीस हेल्पिंग हँडचे शुभम राखुंडे, लोकमतचे सहकारी श्रीकांत मडके, रसुल तांबोळी, दीपक सावत, रामरतन कांबळे, सचिन क्षीरसागर, परवेज मुल्ला, गोविंद आडसूळ आदींनी परिश्रम घेतले.
चौकट...
मान्यवरांनी केले रक्तदान...
यावेळी तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान केले. विविध शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांसह महिला शिक्षक, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. ज्येष्ठ कर्मचारी तथा माजी सैनिक श्री पुरी यांच्यासह दृष्टी नसलेले कर्मचारी बिभीषण जगताप - ओमन यांचे रक्तदान कौतुकाचा विषय ठरले होते.
080721\img-20210707-wa0015.jpg
कळंब येथे बुधवारी लोकमतने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन कळंबच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते व प्रभारी नगराध्यक्ष संजय मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ जीवन वायदंडे, नायब तहसीलदार अस्लम जमादार, पांडुरंग कुंभार, प्रा डॉ संजय कांबळे, गुणवंत पवार,प्रा श्रीधर भवर, अजित पिंगळे, मुसद्दीक काझी, डॉ रामकृष्ण लोंढे आदी उपास्थित होते