उस्मानाबाद : कोरोना व डेंग्यूची लक्षणे काहीशी सारखीच असतात. त्यामुळे त्रास होत असेल तर दुखणे अंगावर काढणे धोकादायक ठरू शकते. कोरोना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये लवकर उपचार घेणे फायदेशीर ठरते. त्यामुळे तत्काळ चाचणी करणे महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात डासांची उत्पत्ती वाढत असल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढतात, तसेच डेंग्यू व कोरोनामध्ये ताप अंगदुखी आदी लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे चाचणी करून वेळेवर उपचार घ्यावेत.
कोरडा दिवस पाळा..
पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असते. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मच्छरांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे महत्त्वाचे असते. त्यासाठी आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळणे, मच्छरांपासून संरक्षण मिळविण्यासाठी फायद्याचे होईल, लोशनचा वापर करणे, मच्छरदाणी वापरणे गरजेचे आहे. लक्षणे आढळून आल्यास त्वरित चाचणी करावी.
डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हा हिवताप अधिकारी
चाचणी कुठली
कोरोना -आरटीपीसीआर, ॲँटिजन
डेंग्यू -इलायझा
अंगदुखी व ताप
कोरेाना व डेंग्यू या दोन्ही आजारांमध्ये ताप जास्त प्रमाणात येतो, तसेच अंगदुखीचा त्रास होतो.
कोरोनामध्ये सर्दी व खोकल्याचे प्रमाण अधिक असते. डेंग्यूमध्ये मात्र सर्दी खोकला होत नाही.
डेंग्यूमध्ये डोळे दुखतात. कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये काहींना त्रास जाणवतो.
डेंग्यूचे रुग्ण
२०१९ ४८
२०२० १८
२०२१ २५
पाणी उकळून प्या, डासांपासून सावध रहा
पावसाळ्यात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असते. त्यामुळे आजार बळावतात. म्हणून पाणी उकळूनच प्यावे.
डासांपासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर द्यावा. गरजेनुसार औषधांचा वापर करावा.
शारीरिक त्रास जाणवत असेल, तर तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत.