उस्मानाबाद -जिल्ह्यातील एका रूग्णाचा म्युकरमायकाेसिस (बुरशीजन्य) या आजारने रविवारी साेलापूर येथील एका खाजगी रूणालयात उपचारादरम्यान मृयू झाला. काेराेना पाठाेपाठ म्युकरमायकाेसिसचे नवीन संकट आढावल्याने उस्मानाबादकरांची चिंता वाढली आहे.
जिल्हा परिषद आराेग्य विभागातील अर्जुन लाकाळ (रा. पळसप, ता. उस्मानाबाद) यांना दहा ते पंधरा दिवसांपूर्वी काेराेनाची लागण झाली हाेती. ते या आजारातून बरे हाेत असतानाच डाॅक्टरांना त्यांच्यात म्युकरमायकाेसिसची लक्षणेही दिसून आली. उस्मानाबादेत चाचणीची साेय नसल्याने डाॅक्टरांनी तीन दिवसांपूर्वी त्यांना तातडीने साेलापूर येथे रेफर केले. एका खाजगी दवाखान्यात म्युकर चाचणी केल्यानंतर त्यांना म्युकरमायकाेसिसची लागण झाल्याचे समाेर आले. यानंतर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच निकामी झालेला डाेळा शस्त्रक्रिया करून काढावा लागला. त्यातच त्यांची प्रकृती खालावल्याने रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.