शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
3
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
4
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
6
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
7
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
8
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
9
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
10
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
11
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
12
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
13
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
14
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
15
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
16
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
17
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
18
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
19
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
20
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 

Corona Virus : लोहारा तालुक्यातील २१ गावात १० दिवसांचा जनता कर्फ्यु लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:49 PM

Corona Virus: तालुक्यात आतापर्यत तीन हजारच्या पुढे रग्ण सापडले आहेत. त्यात कोरोनामुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देत ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील २१ गावात कोरोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी १२ जूनपर्यत या २१ गावात जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

लोहारा शहरासह तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यात आतापर्यत तीन हजारच्या पुढे रग्ण सापडले आहेत. त्यात कोरोनामुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४०० वर आजही अँक्टिव्ह आहेत.याच पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करून निर्बंध लावण्यात आले होते. परिणामी काही प्रमाणात रुग्ण संख्या आटोक्यात आली होती. पण पुन्हा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी तातडीने नियंत्रण करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. 

याच अनुषंगाने उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी तालुक्यातील २१ गावांमध्ये जनता कर्फ्यु लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार २ ते १२ जून रोजी सकाळी ७ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार मनाई हुकूम आदेश लागू केला आहे. या आदेशाप्रमाणे २१ गावातील सर्व दुकाने पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील. तथापि रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न मेडिकल चालू राहतील. तसेच या गावातील नागरिकांना संबंधित ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या ठराविक वेळेत अत्यावश्यक सेवा पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदरील अत्यावश्यक सेवा पुरवताना सोशल डिस्टनसिंग व आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

या २१ गावांमध्ये जनता कर्फ्यु लागू :कानेगाव,नागुर,लोहारा खुर्द,जेवळी, एकोंडी लो, धानुरी, हिप्परगा (रवा), सास्तुर,खेड, आष्टाकासार, मार्डी, कास्ती बु. ,अचलेर,  भातागळी,मोघा बु, सालेगाव, कोंडजीगड, नागराळ, तावशीगड, वडगाव (गां), जेवळी दक्षिण हे गावे आहेत.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या