परंड्यापासून दोन किमी अंतरावर हे गाव असल्यामुळे या गावाचा परंड्याशी रोजचा संपर्क. तरीही ग्राम दक्षता समितीच्या सतर्कतेमुळे आणि गावातील नागरिकांच्या सहकार्यामुळे गावात मागील १५ ते २० दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.
गावात यापूर्वीच कोरोना प्रतिबंधक औषध फवारणी असून, जनजागृती, गावकऱ्यांशी संवाद, सर्व कुटुंबाचे आरोग्य सर्वेक्षण, औषधे वाटप, यामुळे गाव सध्या कोरोनामुक्त आहे.
रुई गावच्या सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील या तिन्ही मुख्य जबाबदारीच्या पदांवर महिला विराजमान आहेत.
गाव कोरोनामुक्त होण्यासाठी सरपंच कुसुम जगताप, उपसरपंच मीरा लिमकर, तलाठी विशाल खळदकर, ग्रामसेवक बी.एस, राठोड, शिक्षक राऊत, आशा सेविका ललिता लिमकर, पोलीस पाटील प्रतिभा लिमकर, अंगणवाडी सेविका वैशाली लिमकर आदींनी परिश्रम घेतले.