उस्मानाबाद - येथील जिल्हा रुग्णालयातून बुधवारी १०७ व्यक्तींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले असता, नव्याने ६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता बधितांची संख्या २३५ वर जाऊन ठेपली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असले तरी दिवसागणिक बधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी १०७ जणांचे स्वॅब घेऊन लातूर येथे तपासणीसाठी पाठविले होते. रात्री साडेदहा वाजता जिल्हा रुग्णालयाला अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार बधितांच्या संख्येत आणखी ६ ने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २३५ झाली आहे.
सहा पैकी परांडा व डिग्गी रोड उमरगा येथील प्रत्येकी एक, तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील दोन तर उस्मानाबाद औधोगिक वसाहतीतील दोघा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, १०७ पैकी उर्वरित ९४ नमुने निगेटिव्ह, सहा अनिर्णित तर एक बाद झाला आहे.