उस्मानाबादेत पावसाच्या सरी
उस्मानाबाद - दिवसभराच्या उकाड्यानंतर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उस्मानाबाद शहरासह परिसरात पावसाच्या सरी काेसळल्या. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले हाेते. खरीप हंगामातील साेयाबीनसह उडीद, मूग यासारख्या पिकांना हा पाऊस फायदेमंद ठरेल, असे शेतक-यांकडून सांगण्यात आले.
रस्त्यांवर खड्डेच खड्डे
ईट - भूम तालुक्यातील ईटहून लांजेश्वर, आंद्रुडमार्गे बीड जिल्ह्यातील जातेगावला जाेडणा-या रस्त्याची चाळण झाली आहे. जागाेजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावर सातत्याने लहान-माेठे अपघात घडत आहेत. पावसाळ्यात तर अशा घटनांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
विजेचा लपंडाव...
उस्मानाबाद -शहरातील उपळा राेड परिसरात लाेकवस्ती झपाट्याने वाढत आहे. शेतक-यांची संख्याही माेठी आहे. असे असतानाही या भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित हाेत आहे. थाेडाबहुत पाऊस झाला तरी वीज बंद हाेते. त्यामुळे या भागातील रहिवाशांसह शेतक-यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे वीज कंपनीने लक्ष देण्याची गरज आहे.
साेयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव
उस्मानाबाद -अधूनमधून पडलेल्या पावसावर जिल्ह्यातील काही भागात साेयाबीनचे पीक जाेमदार आले आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच आता पाने कुरतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करू लागले आहेत.