ग्रामस्थांत संताप : अलान-माेठ्या अपघातांना मिळतेय निमंत्रण
तुळजापूर : साधारपणे दाेन महिन्यांपर्वी झालेल्या अतिवृष्टीत केशेगाव मार्गावरील तुळजापूरनजीक असलेल्या नदीवरील पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी सातत्याने लहान-माेठे अपघात घडत आहेत. असे असतानाही पुलाच्या डागडुजीकडे संबंधित यंत्रणेची डाेळेझाक हाेत असल्याने संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे.
जिल्हाभरात ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकासह शेतजमिनीचे मोठे नुकसान केले आहे. तब्बल अठरा तास पाऊस पडल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांसह शेतजमिनीही खरडून गेल्या आहेत. हे संकट येऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. असे असतानाही संपूर्ण नुकसानीचा पंचना करण्यात आलाेला नाही. तुळजापूर-केशेगाव मार्गावर तुळजापूर खुर्दनजीकच्या नदीवरील पुलाची पावसामुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पुलाचा भराव वाहून गेला आहे. नदीच्या पात्राएवढीच पुलाची उंची असल्याने पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जाताे. त्यामुळे तडवळा, मोर्डा, धारूर, बामणी, केशेगाव, बेंबळी आदी गावांतील ग्रामस्थांसह वाहनधारकांनाही गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे. पुलावर सातत्याने लहान-माेठे अपघात घडत असल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे. पुलाची उंची वाढवावी, अशी मागणीही ग्रामस्थांतून हाेत आहे.
चाैकट...
केशेगाव मार्गावर सातत्याने वर्दळ असते. हीच बाब लक्ष्ययात घेऊन पुलाची डागडुजी करणे गरजेचे आहे. याबाबत सातत्याने ग्रामस्थांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या मागण्या बेदखल केल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतूनही तीव्र प्रतिक्रीया उमटू लागलया आहेत.