दोघांवर कारवाई
उस्मानाबाद : येथील शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने २२ जून रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. यात इंदिरा नगर येथे महंमद तांबोळी तर जुना बस डेपो भागात गोविंद विधाते हे जुगाराचे साहित्य व रोख रकमेसह मिळून आले. त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेरमध्ये छापा
उस्मानाबाद : ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने २२ जून रोजी तेर येथे छापा टाकला. यावेळी सतीश कसबे हे गाव शिवारात जुगाराचे साहित्य व रोख ३८० रुपयांसह मिळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून त्यांच्या विरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गावठी दारू जप्त
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील शिराढोण पोलिसांनी २२ जून रोजी नायगाव येथे छापा टाकला. यावेळी सुरेश महादेव गरड हे गावच्या शिवारात गावठी दारूसह मिळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून गरड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.