भूम (जि. उस्मानाबाद) : महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत तालुक्यातील ५ हजार ३२ लाभार्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून, जवळपास ३३ कोटी ३५ लाख रुपये कर्ज खात्यात जमा झाले आहेत. दरम्यान, २८४ शेतकºयांचे अद्यापही आधार प्रमाणीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव रखडले आहेत.आतापर्यंत तालुक्यातील ५ हजार ३२ लाभार्थी शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण पूर्ण केल्याने त्यांच्या खात्यात ३३ कोटी ३५ लाख प्रशासनाकडून जमा करण्यात आले आहेत. परंतु, अजूनही अनेकांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. त्यामुळे सद्यस्थितीत २८४ लाभार्थी शेतकºयांची कर्जमाफी होवू शकलेली नाही.याद्या प्रसिद्ध झाल्यामहात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत अल्प मुदत पीक कर्ज माफीच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या यादीमधील शेतकºयांनी आधार कार्डसोबत विशिष्ट ओळख क्रमांक घेऊन बँकेचा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन पडताळणी करावी.पडताळणीनंतर...पडताळणी झाल्यावर नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम कर्ज खात्यात जमा होईल. उर्वरित ९८ शेतकºयांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आठ दिवसांत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी लक्ष्मीकांत कोकणे यांनी केले आहे....त्यानंतरच होणार आहे कर्जमाफीभूम तालुक्यात २८४ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण रखडले असून, त्यांनी तात्काळ बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घेऊन कर्जमुक्तीचा लाभ घ्यावा व जे कर्जदार मयत आहेत, अशा शेतकºयांच्या कुटुंबांनी वारसाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी त्यानंतरच कर्जमाफी होईल, असे सहायक निबंधक कुमार बारकुल यांनी सांगितले.
आधार प्रमाणिकरणाअभावी कर्जमाफीचे प्रस्ताव रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 2:18 AM