ओबीसींच्या संघटना एकवटल्या
कळंब : शासनाने न्या. जी. रोहणी आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी तसेच ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांच्या मागण्या पूर्ण करून या समाजाला मुख्य प्रवाहात आणावे, अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीचे नेते पांडुरंग कुंभार यांनी केली.
कळंब शहरातील महावीर मंगल कार्यालय येथे बारा बलुतेदार महासंघ व ओबीसी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे बारा बलुतेदार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे, लिंगायत संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ मुंडे, तेली समाज संघटनेचे राज्य युवक उपाध्यक्ष रवी कोरे आळणीकर, ओबीसी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, बारा बलुतेदारांचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष संतोष हंबीरे, समता परिषदेचे राज्य सरचिटणीस आबासाहेब खोत, कुंभार समाजाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस कल्याण कुंभार, जिल्हाध्यक्ष सतीश कदम यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी बारा बलुतेदार व ओबीसी बांधवांनी एकत्रित येण्याची काळाची गरज उपस्थित बांधवांसमोर आपल्या भाषणातून मांडली. याप्रसंगी संतोष हंबीरे, रवी कोरे आळणीकर, लक्ष्मण माने, डी. एन. कोळी, कल्याण कुंभार आदींची भाषणे झाली. तेली समाजाचे कळंब शहराध्यक्ष अशोक चिंचकर, शहाजी माने, बालाजी पवार, अंकुश गायकवाड, शुभम कदम, रविराज खंडेराव, हरिदास जाधव, बाळासाहेब कुंभार, नाना पवार, गोकुळ बरकसे, दत्ता शेवडे, बापू सुरवसे, अरूण जाधवर, बाळू पौळ, महेश इटकर, बाबा कुंभार, रमेश कुंभार, अरूण मुंडे, सचिन गायकवाड, बबन हौसलमल, मस्के नाना, मुन्ना मंडाळे, गोकुळ मंडाळे आदींची उपस्थिती होती.
चौकट.....
जातनिहाय जनगणना, राजकीय आरक्षण हवे
अध्यक्षीय भाषणात पांडुरंग कुंभार यांनी केंद्र सरकारने न्या. जी. रोहणी आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, राजकीय आरक्षण दिले पाहिजे. त्यासाठी ओबीसी आयोगाची स्थापना करून न्यायालयात इंपेरिकल डाटा सादर करावा व ओबीसी राजकीय आरक्षण मिळवावे, अशी मागणी कुंभार यांनी या मेळाव्यात केली.
धनंजय शिंगाडे म्हणाले की, ओबीसी समाजाचे महामंडळ स्थापन करावे व त्याला एक हजार कोटी रुपये देण्यात यावे व त्यातून आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा कमी करा, ही आमची मागणी आहे.
260721\0052img-20210726-wa0057.jpg
कळंब येथे ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी लढा देण्याची घोषणा केली. यावेळी पांडुरंग कुंभार, राजाभाऊ मुंडे, धनंजय शिंगाडे, संतोष हंबीरे आदी उपस्थित होते