यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मराठवाड्यात जर असे उद्योजक उभा राहत असतील आणि आपल्या भागाला आर्थिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम करण्यास तयार होत असतील तर मी आणि माझे सर्व सहकारी कायम आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही दिली.
कोरोनाच्या महामारीत धाराशिव कारखान्याच्या माध्यमातून देशात पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा केल्याबद्दल खा. राजेनिंबाळकर यांनी चेअरमन अभिजित पाटील यांचे कौतुकही केले. मल्टीस्टेटच्या माध्यमातून अनेक तरुणांना, उद्योगाला प्रोत्साहन देऊन उस्मानाबादसारख्या जिल्ह्यात उद्योगाची नांदी घडविण्यात ही संस्था हातभार लावेल, असा विश्वास धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जनता बँकेचे माजी अध्यक्ष विश्वास शिंदे, ॲड. व्यंकट गुंड, दत्ताभाऊ कुलकर्णी, हनुमंत मडके, विक्रम पाटील, सुधीर सस्ते, प्रदीप खामकर, अमित शिंदे, प्रशांत पाटील, नागनाथ नागणे, सरपंच चरणेश्वर पाटील, सुधाकर रितापुरे यांच्यासह विविध मल्टीस्टेट संस्थाचे चेअरमन संदेश दोशी, सूरज पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक संतोष कांबळे, सुरेश सावंत, दिनेश शिळ्ळे, दीपक आदमिले, संदीप खारे, आबा खारे, रणजित भोसले, सुहास शिंदे, विकास काळे, सजंय खरात आदी उपस्थित होते. (वाणिज्य वार्ता)