कळंब : ‘स्वच्छ गाव सुंदर गाव’ उपक्रमांतर्गत तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा गाडीचे लोकार्पण भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कचरा गाडीमुळे गाव स्वच्छ राहणार असून, प्रगतीस मोठा हातभार लागणार असल्याचे नितीन काळे यांनी सांगितले. तसेच ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून त्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती करता येते, असेही काळे म्हणाले.
याप्रसंगी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजप कळंब तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, माजी सभापती दत्तात्रय साळुंके, जि. प. सदस्य सुरेश कोरे, अरुण चौधरी, मकरंद पाटील, मनोहर शेळके, तसेच सरपंच आशा व्यंकट शेळके, उपसरपंच राहुल चव्हाण, व्यंकट शेळके, चंद्रकांत शेळके, मधुकर शेळके, हरिश्चंद्र शेळके, सुनील पारेकर, सायाजी मासाळ, सोमनाथ सुरवसे, अनिल काळे, कमलाकर शेळके, सुरेश शेळके, बापूराव शेळके, अरुण मासाळ, रंजित चंदनशिवे, गणेश जावळे, सिद्देशराजे भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.