(फोटो : १२ राणा पाटील)
उस्मानाबाद : शहरातील बार्शी नाका ते बोंबले हनुमान या दरम्यानच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. याच्या दुरुस्तीसाठी रहिवाशांकडून वारंवार पाठपुरावा सुरू असून, प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोमवारी या भागातील रस्त्याची पाहणी केली. या परिसरात नुकतेच नालीचे काम झाले आहे. त्यामुळे भुयारी गटाराची आवश्यकता नाही. परंतु, रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची नागरिकांनी यावेळी केली. वास्तविक आमदार पाटील यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी पत्राद्वारे सूचित केले होते. मात्र, अद्याप त्यावर कार्यवाही झालेले नाही.
यावेळी आमदार पाटील यांनी या भागातील रस्त्यांची पाहणी करून रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत सूचना देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्यासमवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश दंडनाईक, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, अमित उंबरे, अमोल राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.