कळंब : तालुक्यातील ताडगाव येथील सार्वजनिक जागेवर तेथील ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने केलेले अतिक्रमण तत्काळ काढावे, या मागणीसाठी भीम आर्मीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पत्नी सदस्य असताना २०१५ ते २०२० या काळात संबंधिताने स्वतःच्या नावाने एक प्लॉट करून घेतला आहे. या व्यतिरिक्त दुसऱ्या सामाजिक जागेवर अतिक्रमण करून पत्र्याचे शेड मारले आहे, तसेच घनकचरा व कडब्याची गंजी टाकून पूर्ण जागा ताब्यात घेतली आहे. याबाबत लेखी व तोंडी तक्रार केली असता, ग्रामसेवक यांनी पत्र्याचे शेड मारत असताना काम थांबविण्याची नोटीस दिली होती. त्या नोटीसलाही न जुमानता शेड मारण्याचे काम पूर्ण केले, असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर मधुकर गायकवाड, बालाजी शिंदे, जयसिंग आव्हाड, प्रमोद आव्हाड, अभिमान गायकवाड, रविराज गायकवाड, गोविंद गायकवाड, आकाश आव्हाड, प्रमोद आव्हाड, गणेश ससाने, आकाश गायकवाड, रघुनाथ गावडे, केशरबाई आव्हाड, संतोष शिंदे, सुमन बचुटे, अशोक आव्हाड, सुनीता गायकवाड, कमल गायकवाड, उत्तम शिंदे, वैजनाथ गायकवाड, लोचना गायकवाड, स्वागत आव्हाड, दत्ता गायकवाड, मुकेश गायकवाड, अर्चना साळवे, गोवर्धन आव्हाड, ज्योती गायकवाड, रावसाहेब आव्हाड, अनुरथ रोकडे, रमाबाई रोकडे, आश्रुबा गायकवाड, सीताबाई गायकवाड, सुधाकर गायकवाड, रंजना गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, विष्णू गायकवाड, गौतम गायकवाड, सुदाम वाघमारे, भारत सटवा गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.