शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

साहित्य संमेलन रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:33 AM

——————————————— माजी विद्यार्थ्यांचा नळी येथे सत्कार अनाळा : भूम तालुक्यातील नळी येथील कै. सु.म. तरंगे आश्रमशाळेतील माजी विद्यार्थी किरण ...

———————————————

माजी विद्यार्थ्यांचा नळी येथे सत्कार

अनाळा : भूम तालुक्यातील नळी येथील कै. सु.म. तरंगे आश्रमशाळेतील माजी विद्यार्थी किरण राजू खाडे याची यूपीएससी परीक्षेद्वारे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात निवड झाली आहे. तसेच बबन रामकिसन हराळ यांची कृषी साहाय्यकपदी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आश्रमशाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सचिव बिरमल तरंगे, दादासाहेब तरंगे, प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिल खताळ, माध्यमिकचे मुख्याध्यापक दादासाहेब थोरात, आंधळे, कदम आदींनी विद्यार्थ्यांचे काैतुक केले.

———————————————

योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

उस्मानाबाद : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने २०२०-२१ मध्ये विविध आठ योजना राबविण्यात येणार आहेत. या योजनांच्या लाभासाठी ११ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी केले आहे. या विभागामार्फत जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत दहा अधिक एक शेळी गट वाटप करणे, जिल्हास्तरीय अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत दोन दुभत्या जनावरांच्या गटाचा पुरवठा करणे, अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धनविषयक प्रशिक्षण आदी योजना राबविल्या जात आहेत.

———————————————

लोकशाहीदिनी गैरहजर राहिल्यास कारवाई

उस्मानाबाद : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन बैठक घेण्यात येते. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येतो. या बैठकीसाठी हजर राहण्यासाठी कार्यालयांना लेखी पत्र देऊन कळविण्यात येते. तथापि, संबंधित कार्यालयाचे प्रमुख या बैठकीस अनुपस्थित राहिल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा उमरगा येथील तहसीलदार संजय पवार यांनी दिला आहे.

———————————————

पांगरदरवाडीत २६ शिवभक्तांचे रक्तदान

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २६ शिवभक्तांनी रक्तदान केले. यात महिला रक्तदात्यांचाही पुढाकार दिसून आला. या वेळी तामलवाडीचे स.पो.नि. सचिन पंडित, सरपंच विजय निंबाळकर, पोलीस पाटील दादासाहेब मारडकर, प्रताप निंबाळकर, सोमनाथ शिंदे, डॉ. अश्‍विनी गोरे, दिनकर सुपेकर, गणेश साळुंके, सुषमा घोडके, महादेव जाधव, महेश सावंत, मंगेश कदम, ऋषिकेश टिंगरे, अमिर पठाण, प्रमोद कदम, शंकर गाटे आदी उपस्थित होते.