शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

आधी डोक्यात हातोडा घातला, नंतर गळा चिरला; प्रॉफिट शेअरिंगच्या वादातून मित्राचा खून केला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 11:33 AM

ढाब्याची कमाई ठरली वादाचे कारण; शेअरिंगवरून अडून बसलेल्या मित्राचा केला खून

वाशी (जि. उस्मानाबाद) - ढाब्याच्या उत्पन्नाच्या वाटणीवरून सहकारी मित्राचा धारधार शस्त्राने गळा चिरून खून केला. ही धक्कादायक घटना ३१ मेच्या रात्री १०.४५ वाजण्याच्या  सुमारास तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील येसवंडी शिवारातील मोटे यांच्या पेट्रोल पंपाजवळील ढाब्यावर घडली. घटनेची माहिती मिळताच तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या. वाशी तालुक्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील येसवंडी शिवारात मोटे यांच्या पेट्रोल पंपाजवळ विश्वास गायकवाड यांच्या शेतात श्रीशाम शेखावटी राजस्थानी ढाबा आहे. हा ढाबा राजस्थान राज्यातीलअनुपसिंह शर्मा व अवनिश मान (रा.बिर, ता. पचेरी, जि. झुनझुनी) यांनी भागीदारीत चालवण्यास घेतला होता. अनूप व अवनिश या दोघांमध्ये नफा वाटणीच्या कारणावरून नेहमीच कुरबुरी होत होती. ३१ मे रोजी सकाळी ढाब्याच्या उत्पन्नतील पैसे वाटणीच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्यावर अनूप शर्मा यांनी आज ढाबा उघडू नका, असे सांगून दिवसभर ढाबा बंद ठेवला. यानंतर अनूप यांने रात्री नऊ  वाजेच्या सुमारास जेवण करून ढाब्यातील एक लाईट चालू ठेवली व बाकीच्या लाईट बंद करून खाटेवर झोपला.

साधारणपणे रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास अनूप झोपेत असतानाच अवनिश याने लोखंडी हातोड्यांने प्रहार करून गंभीर जख्मी केले. सदरील घटना ढाब्यावरील कामगारांनी पाहिली असता, धावत जाऊन त्याच्या हातातील हातोडा घेऊन बाजूलाच असलेली शेडलगत फेकून दिला. तेव्हा ''तुम्ही मध्ये पडू नका'' आशा शब्दात अवनिश याने कामगारांना दम दिला. त्यामुळे ढाब्यावरील कामगार दूर गेले. कामगार दूर गेल्याचे पाहून किचनमधिल धारधार बतई आणून त्यांने अनुपचा गळा कापला. 

हा थरार पाहून ढाब्यावर कामास असलेला आचारी मन्ना जगदीश याने आरडाओरड केली. यानंतर ढाब्यावरील कामगार व बाजूच्या पेट्रोल पंपावरील काही धावत आले. लोक लयाचे पाहून  पळून जाण्याच्या तयारीत असलेला अविनाश मान यास पकडून ठेवले. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली असता, पोलीस निरीक्षक सुरेश दळवे, पोउपनी पवन निंबाळकर, किशोर काळे, प्रियांका फड हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस गजाआड केले.  यानंतर जागीच मयत झालेल्या अनूप शर्मा याचे शव पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पंचनामा झाल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीOsmanabadउस्मानाबादDeathमृत्यू