लोकमत न्यूज नेटवर्क धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द या गावच्या शिवारातून वाहणाऱ्या छोट्या ओढ्यातून मागील दोन दिवसांपासून निळे पाणी वाहू लागले होते. हौशी तरुणांनी या पाण्याचे व्हिडीओ तयार करून ते व्हायरल केले.
मंगळवारी वरिष्ठ भूवैज्ञानिक मेघा शिंदे यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी या ओढ्याची पाहणी केली. तेव्हा या ओढ्यालगत द्राक्षाच्या बागा आढळून आल्या. तेथे द्राक्षावर फवारणीसाठी काही रासायनिक द्रव्ये वापरली जातात. त्यातील मुदत संपलेली द्रव्ये काहींनी यापूर्वीच या ओढ्याच्या प्रवाहात टाकली होती. पावसाने पाणी आल्यानंतर बॉक्समधील रसायन मिसळून हे पाणी निळे झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर अंतिम निष्कर्ष निघेल.