धाराशिव : कंत्राटी एएनएम/जीएनएम, एलएचव्ही यांना वयाची व कसल्याही परीक्षेची अट न घालता सरळ सेवेत कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य नर्सेस युनियनच्या वतीने १७ मे राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
१७ वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर एएनएम, जीएनएम, एलएचव्ही यांनी काेराेना काळात सेवा बजावली आहे. अजूनही त्या सेवेत आहेत. त्यामुळे एनएचएम, एनयुएचएम अंतर्गत सर्व कंत्राटी एएनएम, जीएनएम एलएचव्ही शहरी व ग्रामीण नर्सेसचे रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. १३ ते १७ मार्च या कालावधीत मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कक्षात २० मार्च रोजी बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत आरोग्य सेविका, अधिपरिचारिका व इतर एनएचएम कंत्राटी कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा झाली. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी ३१ मार्च पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाही काेणतीच ठाेस कार्यवाही झाली नाही. सरकार केवळ आश्वासनांवर बाेळवण करीत असल्याचा आराेप करीत असल्याचे सांगत बुधवारी जिल्हा कचेरीसमाेर धरणे आंदाेलन करयात आले. आयटकचे नेते दिलीप उटाणे, संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील आंदाेलनात कंत्राटी नर्सेस युनियनच्या अध्यक्ष सुमन फुले, सविता गोरे, कविता माळी, एम.जी. मुंढे, ए.बी. थिटे, एस. एस. ठवरे, स्वाती लक्ष्मण इळे, अभिलाषा बारगजे, एस.बी. लकडे, मीरा जाधव, बी.जी. हिप्परगे, एस.एस. क्षीरसागर, ए. एम. सत्वदर, एस.एस. माने आदी सहभागी झाले हाेते.
विविध पक्ष, संघटनाचा पाठिंबाकंत्राटी नर्सेसच्या धरणे आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, शहराध्यक्ष आयाज शेख, माजी गटनेते पृथ्वीराज चिलवंत, राहुल वाघमारे, तौफिक काझी, गौतम गायकवाड, अॅड. शरदचंद्र भोसले, रवींद्र गायकवाड आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. जिल्हा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अॅड. जावेद काझी तसेच महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदत्त बेद्रे, सचिव ज्ञानेश्वर लगड, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनीही कंत्राटी नर्सेसच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.व कसल्याही परीक्षेची अट न घालता सरळ सेवेत कायम करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य नर्सेस युनियनच्या वतीने १७ मे राेजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
१७ वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर एएनएम, जीएनएम, एलएचव्ही यांनी काेराेना काळात सेवा बजावली आहे. अजूनही त्या सेवेत आहेत. त्यामुळे एनएचएम, एनयुएचएम अंतर्गत सर्व कंत्राटी एएनएम, जीएनएम एलएचव्ही शहरी व ग्रामीण नर्सेसचे रिक्त पदावर समायोजन करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. १३ ते १७ मार्च या कालावधीत मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या कक्षात २० मार्च रोजी बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत आरोग्य सेविका, अधिपरिचारिका व इतर एनएचएम कंत्राटी कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा झाली. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी ३१ मार्च पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार सेवेत समायोजन करण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाही काेणतीच ठाेस कार्यवाही झाली नाही. सरकार केवळ आश्वासनांवर बाेळवण करीत असल्याचा आराेप करीत असल्याचे सांगत बुधवारी जिल्हा कचेरीसमाेर धरणे आंदाेलन करयात आले. आयटकचे नेते दिलीप उटाणे, संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील आंदाेलनात कंत्राटी नर्सेस युनियनच्या अध्यक्ष सुमन फुले, सविता गोरे, कविता माळी, एम.जी. मुंढे, ए.बी. थिटे, एस. एस. ठवरे, स्वाती लक्ष्मण इळे, अभिलाषा बारगजे, एस.बी. लकडे, मीरा जाधव, बी.जी. हिप्परगे, एस.एस. क्षीरसागर, ए. एम. सत्वदर, एस.एस. माने आदी सहभागी झाले हाेते.
विविध पक्ष, संघटनाचा पाठिंबाकंत्राटी नर्सेसच्या धरणे आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, शहराध्यक्ष आयाज शेख, माजी गटनेते पृथ्वीराज चिलवंत, राहुल वाघमारे, तौफिक काझी, गौतम गायकवाड, अॅड. शरदचंद्र भोसले, रवींद्र गायकवाड आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. जिल्हा काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अॅड. जावेद काझी तसेच महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुरुदत्त बेद्रे, सचिव ज्ञानेश्वर लगड, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनीही कंत्राटी नर्सेसच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.