वाशी : रोडलगत थांबलेल्या कंटेनरच्या चालकास अज्ञात पाच चोरट्यांनी जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देत चालकाजवळील रोकड, मोबाईल व कंटेनरमधील सात दुचाकी चोरून नेल्या. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री वाशी तालुक्यातील सोलापूर-धुळे महामार्गावरील नरसिंह साखर कारखान्याजवळ घडली. चालकाच्या तक्रारीवरून वाशी पोलिसात ५ नोव्हेंबर रोजी अज्ञात पाच चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, उत्तरप्रदेश राज्यातील मुहरैया येथील चालक नयाससोद्दीन खान हे म्हैसूर येथील कंपनीतील ४० दुचाकी एका कंटेनरमधून जयपूरकडे घेवून जात होते. धुळे-सोलापूर महामार्गावरील तालुक्यातील इंदापूर येथील नरसिंह साखर कारखान्याजवळील सर्व्हीस रोडवर एका बंद असलेल्या पत्रा शेडच्या समोर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या त्यांनी कंटेनर थांबवून बाथरुमला जाऊन परत गाडीत बसले. यावेळी खिडकीतून अज्ञात पाच इसम अचानक कंटेनरमध्ये शिरुन त्यांना काठयांनी मारहाण करु लागले. जिव वाचविण्यासाठी खान यांनी खिडकीतून उडी टाकत रस्त्याला धावू लागले. यावेळी तीन चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांच्या गळ्याला चाकू लावत खिशातील पाकीटातील २७ हजार रूपये व मोबाइल जबरीने काढून घेतला. त्यानंतर त्यांच्या तोंडावर पांघरून टाकून जिवे मारण्याची धमकी देत कंटेनर चालू करून काही अंतरावर पुढे नेले. तेथे कंटेनरनधील सात दुचाकी घेऊन व पळून गेले. या प्रकरणी चालक नयाससोद्दीन खान यांनी ५ नोव्हेंबर रोजी वाशी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
महामार्गावर मतदीसाठी नाही थांबले कोणीचचाेरटे मारहाण करु लागताच भितीपोटी चालकाने कंटनेरच्या खिडकीतून रोडवर उडी मारुन महामार्गावर धावू लागले. यावेळी त्यांनी रोडवरुन जाणाऱ्या वाहनधारकांकडे मदत मागत वाहने थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही गाडी थांबविली नाही.