अणदूर : हॅलो मेडिकल फाउंडेशन अंतर्गत आरोग्य स्वराज्य प्रकल्पाच्या वतीने काेराेना महामारीच्या काळात जीवाची परवा न करता लाेकांची सेवा करीत असलेल्या ३५ आशा कार्यकर्तींना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांच्या हस्ते काेराेनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिमीटर, थर्मामीटर, मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, फेसशिल्ड, नोंदवही आदी साहित्याचे किट वाटप करण्यात आले. या वेळी मंचावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत अहंकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास पवार, सरपंच रामचंद्र आलुरे, उपसरपंच डॉ. नागनाथ कुंभार, विस्तार अधिकारी भांगे, डॉ. जितेंद्र कानडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. शिवलिंग शेटे, डॉ. अक्षय जानकर, ग्रामविकास अधिकारी देवीदास चव्हाण, राजश्री चव्हाण, अनुराधा पापडे, संगीता गवळी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
आशा कार्यकर्तींना किट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:32 AM