लोहारा येथील शिव मित्रमंडळाचा उपक्रम
लोहारा : शहरातील शिव मित्रमंडळाच्या माध्यमातून युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्या वतीने ३०० कुटुंबांना वेपोराइझरचे (वाफ घेण्याची मशीन) वाटप करण्यात येत आहे. यांचा शुभारंभ तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.
शहरातील शिवनगर येथील हनुमान मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गजानन शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, राजेंद्र माळी, रघुवीर घोडके, युवासेना उपजिल्हा प्रमुख नामदेव लोभे, शिवसेना शहर प्रमुख सलीम शेख, रघुवीर घोडके, महेबूब गंवडी, मधुकर भरारे, राम चपळे यांच्या हस्ते शिवनगर व प्रभाग क्र. ६ मध्ये या मशीनचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अशोक कटारे यांनी नागरिकांना या मशीनचा वापर कसा करावा, याबाबत माहिती दिली. यावेळी दत्ता मोरे, किरण पाटील, कमलाकर मुळे, बजरंग माळी, शंकर साखरे, अंकुश चपळे, महेश पाटील, महेश बाळू पाटील, किशोर क्षीरसागर, ओमकार बिराजदार, सूरज माळी, विक्रम माळी, शिवकुमार बिराजदार आदी उपस्थित होते.
फोटो - लोहारा शहरातील शिवनगर येथे नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप तहसीलदार संतोष रुईकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. अशोक कटारे, गजानन शिंदे, अमोल बिराजदार, रघुवीर घोडके, राजेंद्र माळी, मधुकर भरारे आदी.