(फोटो : शिंदेवाडी ०३)
उस्मानाबाद : तालुक्यातील शिंदेवाडी येथे वडार समाजाला तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते बुधवारी दगड गौणखनिजाच्या स्वामित्वधनातून सुट मिळण्यासाठी ओळखपत्राचे वाटप करण्यात आले.
शिंदेवाडी येथे वडार समाज मोठ्या संख्येने राहत आहे; मात्र या समाजाकडे दगड उत्खननचा परवाना नसल्याने मोठ्या अडचणी येत होत्या. शासन निर्णयानुसार ज्या व्यक्तींनी महसूल विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत, त्यांना गौण खनिजाच्या स्वामित्वधनातून सूट मिळण्याकरिता ओळखपत्राचे तहसीलदार माळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ओळखपत्र असलेल्या व्यक्तीला वर्षाला प्रत्येकी २०० ब्रास दगडाच्या उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. कार्यक्रमास पं. स. सदस्य प्रदीप शिंदे, सरपंच प्रशांत रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, गोरोबा शिंदे, शशिकांत शिंदे, संतोष शिंदे, ग्रामसेवक वाय. बी. मुंढे, मंडळ अधिकारी दत्ता कोळी, काळे, राजू जमादार, बाळासाहेब मंजुळे, पंडित देवकर, विशाल मंजुळे, कपिल गायकवाड, रवि चव्हाण, विलास चव्हाण, लखन मंजुळे, दत्ता मंजुळे, अनिल चौगुले, लक्ष्मण देवकर, बापु मंजुळे, हनुमंत मंजुळे, शंकर मंजुळे, वसंत कुराडे, लिपिक पांडुरंग रणदिवे, सेवक शैलेश शिंदे, संतोष गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.