काटगाव येथे गरजूंना आर्थिक मदत
तुळजापूर - तालुक्यातील काटगाव शिवारात वीज कोसळून पशुपालक बालक व शेळ्या ठार झाल्या होत्या. या कुटुंबीयास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि जगदीश राऊत यांच्या पुढाकारातून ५१ हजारांची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी पोहेकाॅ विलास जाधव, पोकाॅ. धनंजय वाघमारे, लक्ष्मण शिंदे, अझर मुजावर, पोलीस पाटील विनोद सलगरे, साधू माळी, मधुकर चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोरोनाग्रस्त रूग्णांना फळांचे वाटप
तुळजापूर - शहरातील सागर कदम, सुहास कदम यांच्या वतीने कोविड सेंटरमधील रूग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी रूग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, राम चोपदार, दीपक कदम, आदित्य कदम, डाॅ. गार्गिलवार, दुपारगुडे, झाडे आदींची उपस्थिती होती.
गरजूंना जीवनावश्यक किटचे वाटप
तुळजापूर - लाॅकडाऊनमुळे गोरगरीब कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेऊन तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन पंडित व सरपंच रामेश्वर तोडकर यांच्या पुढाकारातून सावरगाव येथे गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. यावेळी जि. प. सदस्य राजकुमार पाटील, उपसरपंच आनंद बोबडे, समाधान डोके, शंकर शिंदे, भागवत डोलारे, परमेश्वर काळदाते, नेताजी कदम, सुरज ढेकणे, बाळासाहेब डोके, महेश गवळी, राजकुमार बोबडे, राजाभाऊ ठाकूर आदींची उपस्थिती होती.
गोरेवाडीत परिचारिकांचा सत्कार
ढोकी - उस्मानाबाद तालुक्यातील गोरेवाडी येथे परिचारिका एन. ए. पठाण यांचा गटप्रवर्तक रेखा गुंजकर-कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आशाताई मोक्षदा शिंदे, अंगणवाडी कार्यकर्ती मिना कदम, मदतनीस अर्चना लबाड, लता सगर, आरोग्य सेवक देवकर यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर वाटप
उमरगा - तालुक्यातील तुरोरी येथील आरोग्य उपकेंद्रात व्यापारी महासंघाच्या वतीने आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्तींना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी महासंघाचे मुख्य सल्लागार अशोक जाधव, पोलीस पाटील प्रशांत पाटील, अभिजीत माडीवाले, बालाजी जाधव, बालाजी माणिकवार, दत्ता पवार, डाॅ. शिल्पा सपली, गणेश सुगावे, विजया कोळी यांच्यासह आरोग्य कर्मवारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका आदींची उपस्थिती होती.
कुन्सावळीत स्मशानभूमीची स्वच्छता
तुळजापूर - तालुक्यातील कुन्सावळी येथील स्मशानभूमीत नवदिशा सामाजिक संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव सुनील नाकटाळे, सुनील शिंदे, सरपंच कविता गायकवाड, उपसरपंच रूपाली शिंदे, ग्रामसेवक स्वामी, श्रीकांत कोकरे, शिवराम शिंदे, सुखदेव शिंदे, अनिल नाकटाळे, धोंडिबा कोकरे, दशरथ शिंदे, राजेंद्र गुंड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
चिंचोलीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण
उमरगा - तालुक्यातील भुयार चिंचोली येथे ग्रामपंचायत व येणेगूर आरोग्य विभागाच्या वतीने गावातील ४५ वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात आले. यावेळी सरपंच रणजित गायकवाड, उपसरपंच विजयाबाई जाधव, ओमकुमार गायकवाड, व्ही. बी. हंगरगेकर, पद्माकर पाटील, मुख्याध्यापक व्ही. एच.पाटील, डाॅ. एल. ई.घोडगे, आरोग्य सेविका झेड. वाय. सय्यद, एस. व्ही. टिकांबरे, एस. ए. जगताप आदींची उपस्थिती होती.