यावर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पाऊस पडत राहिला. त्यामुळे यंदा थंडी पडण्यास थोडा उशिर झाला होता. नोव्हेंबर महिन्यापासून कमाल तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली आले. त्यामुळे वातावरणात गारठा जाणवू लागला. ११ नोव्हेंबर रोजी १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील आठ दिवस तापमान १४ अंशाच्यापर्यंत होते. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा किमान तापमानात वाढ होऊ लागली. त्यामुळे दहा ते पंधरा दिवस थंडी ओसरी होती. डिसेंबर महिन्यात वातावरणात बदल होऊन गारठा वाढू लागला. शनिवारी किमान तापमान १५ अंश सेल्सिअस नोंद झाले. रविवारी १४.४ अंश सेल्सिअस तर सोमवारी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडीवाढल्यामुळे थंडीपासून बचावर करण्याकरिता पहाटे फिरणारे नागरिक उबदार कपड्यांचा वापर करीत आहेत. तर शहरासह ग्रामीण भागातही शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
उबदार कपड्यांना मागणी
दसरा संपल्यानंतर शहरात उबदार कपड्यांचे स्टॉल सजत असतात. मात्र, यंदा थंडी उशिरा सुरु झाली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दहा ते पंधरा दिवस गारठा राहिला. ढगाळ वातारणामुळे काही दिवस उकाडा जाणवू लागला होता. त्यामुळे या स्टॉलवर शुकशुकाट पाहवयास मिळत होता. सध्या मागील दोन तीन दिवसांपासून गारठा वाढू लागल्याने उबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करीत आहेत.
सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
वातावरणात होत असलेल्या बदलामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. शिवाय, दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयास खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे.
दिनांक कमाल किमान
१४ डिसेंबर २७.९ १७. ०
१५ डिसेंबर ३०.० १६. ५
१६ डिसेंबर ३०.२ १९.४
१७ डिसेंबर ३०.५ १७.०
१८ डिसेंबर ३०.८ १८.०
१९ डिसेंबर २८. १ १५.०
२० डिसेंबर २८.१ १४.४
२१ डिसेंबर २८.७ १३. ५