उमरगा : कुंभार समाजासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविल्या जात असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून मशिनरी देखील उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे समाजबांधवांनी अधुनिक मशिनरीचा वापर करून आर्थिक उन्नती साधण्याची गरज आखिल भारतिय प्रजापती महासंघाचे अध्यक्ष व मातीकला बोर्डाचे चेअरमन दत्ताजी डाळजकर यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील हंद्राळ येथे खादी ग्रामोद्योग व कुंभार समाज विकास संस्थेच्या सहकार्याने कुभांर सशक्तीकरण मिशन अतर्गंत २० कुभांर कारागीरांना दहा दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन शनिवारी डाळजकर यांच्य हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शहाजी कुंभार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रजापती महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नागनाथ कुंभार, उपसरपंच व्यंकट तांबाळे, माजी सरपंच रमेश हत्तरगे उपस्थित होते. प्रारंभी संत गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी डाळजकर म्हणाले, पूर्वीच्या काळात माती तुडवून मडकी घडवायला आठ दिवस लागत होते. परंतु, नव्या मशिनरीमुळे हेच काम आता दहा मििनटात होते. समाजातील युवकांनी पुणे, मुबंईत काम करण्यापेक्षा या मशिनरीच्या माध्यमातून ही कला जोपासावी. मातीच्या भांड्याना मागणी वाढत आहे. संघटना केवळ नावाला राहता कामा नये तर तळागाळापर्यंत जाऊन प्रत्येकाच्या हाताला काम मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक नागनाथ कुंभार यांनी केले. यावेळी वरूण डाळजकर, माजी सरपंच कुसूम कुंभार, बालाजी कुंभार, मुख्याध्यापक संजय चालुक्य, एस. जी. खुर्दे, ग्रा. पं. सदस्या सुमीत्रा कुंभार, प्रशिक्षक लक्ष्मण बोरसरे, सदानंद कुभांर, ज्ञानेशवर कुंभार, सुंदरजीत सरगटे, दत्तात्रय तिगलपल्ले, प्रसाद कुभांर, दत्तात्रय कुभांर, कविता कुभांर, ग्रामस्थ, समाजबांधव व महिलांची उपस्थिती होती.