मागील महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराेना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने सजग नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने ग्रामीण तसेच शहरी भागात वेगाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मंगळवारी जिल्ह्यातील १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटांस जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, मुरुम, लोहारा, सास्तूर, भूम, वाशी, तेर ग्रामीण रुग्णालय, उमरगा, परंडा, तुळजापूर, कळंब उपजिल्हा रुग्णालयात कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डाेस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या व्यक्तींनी दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
१२ केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिनचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:34 AM