शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
3
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
5
Gold Silver Price 1 October : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; विकत घेण्यापूर्वी पाहा आज सोनं स्वस्त झालं की महाग?
6
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
7
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
8
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
9
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
10
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
11
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
12
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
13
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
14
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
15
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
16
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
17
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
18
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
19
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
20
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा

उस्मानाबाद लोकसभेत महाआघाडीच्या भरघोस लीडमुळे महायुतीच्या आमदारांचे लागले इंडिकेटर

By चेतनकुमार धनुरे | Published: June 06, 2024 8:03 PM

एक मंत्री, चार आमदार असूनही आघाडीला मताधिक्य

धाराशिव : उस्मानाबाद लोकसभेत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी ही चकित करणारी ठरली आहे. उद्धवसेनेचे ओम राजेनिंबाळकर यांना सर्वच सहाही विधानसभा क्षेत्रातून भरघोस लीड मतदारांनी दिली. विशेष म्हणजे, महायुतीतील एक मंत्री व चार आमदार असताना आघाडीला मिळालेल्या मताधिक्याने त्यांचे इंडिकेटर लागले आहेत.

नजीकच्या काळात राज्यात घडलेल्या राजकीय स्थित्यंतरांचे पडसाद लोकसभा निवडणुकीतून ठळकपणे उमटली. यामुळे ही निवडणूक आगामी विधानसभेची लिटमस टेस्टच ठरली. सततच्या अस्मानी संकटाने होणारे शेतमालाचे नुकसान अन् त्यानंतर पडणारे दर, पक्षांतील ताटातूट, मराठा आरक्षण, द्वेषपूर्ण वक्तव्ये, या काही प्रमुख कारणांचा रोष महायुतीला उस्मानाबाद मतदारसंघात झेलावा लागला. येथून महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर हे ३ लाख २९ हजार ८४६ मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे हे मताधिक्य ठरले आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील पाच मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातून आघाडीला मिळालेली लीड पाहिल्यास निश्चितच या आमदारांची झोप उडवणारी ठरली आहे.

महायुतीच्या मतदारसंघातून आघाडीला लीड...१. औसा विधानसभा (भाजप) : या मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार हे आमदार आहेत. त्यांच्या विधानसभा क्षेत्रातून आघाडीचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना ३४ हजार ९६६ मतांची लीड मिळाली आहे.२. उमरगा विधानसभा (शिंदेसेना) : येथून शिंदेसेनेचे ज्ञानराज चौगुले हे तीन टर्म आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातून विरोधी आघाडीला ४३ हजार ९४४ मतांची लीड आहे.३. तुळजापूर (भाजप) : या मतदारसंघातून माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील हे आमदार आहेत. महायुतीच्या उमेदवारांचे ते पतीही आहेत. त्यांच्या मतदारसंघातून विरोधी उमेदवारास ५२ हजार १७६ मतांची लीड आहे.४. परंडा (शिंदेसेना) : येथील आमदार तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्रीही आहेत. त्यांच्या मतदारसंघातून विरोधी उमेदवार राजेनिंबाळकरांना सर्वाधिक ८१ हजार १७७ मतांची लीड प्राप्त झाली.५. बार्शी (अपक्ष-भाजप समर्थित) : येथून राजेंद्र राऊत हे अपक्ष म्हणून निवडून आले. मात्र, त्यांनी भाजपला समर्थन दिले आहे. त्यांच्या मतदारसंघातून राजेनिंबाळकरांना ५४ हजार २१२ मतांची लीड मिळाली.

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मतेविधानसभा ओम राजेनिंबाळकर (उद्धवसेना) अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार)औसा १०२२४८                         ६७२८२उमरगा १०६६६९                         ६२७२५तुळजापूर १३८७९१                         ८६७१५उस्मानाबाद १३७१५८                         ७६७३५परंडा            १३३८४८                         ५२६७१बार्शी             १२४८८३                         ७०६७१

टॅग्स :osmanabad-pcउस्मानाबादlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४omraje nimbalkarओमराजे निंबाळकर