गतिराेधक हटविण्याची मनसेची मागणी
उस्मानाबाद -नळदुर्ग ते तुळजापूर महामार्गावरील चिवरी पाटील, हगलूर पाटील आदी ठिकाणी अनावश्यक गतिराेधक तयार करण्यात आले आहेत. हे गतिराेधक तातडीने हटवावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर शाखेकडून करण्यात आली. मागणीचे निवेदन गुरुवारी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग साेलापूर यांच्याकडे देण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव ज्याेतिबा येडगे, शहराध्यक्ष आलीम शेख, प्रमाेद कुलकर्णी, रमेश घाडके आदी उपस्थित हाेते.
राजकुमार घाडगे यांचा सत्कार
उस्मानाबाद - तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी महाविद्यालयातील प्रा. राजकुमार घाडगे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त मंगळवारी सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक विशाल राेचकरी, विजय कंदले, औदुंबर कदम, भानुदास जाधव, अण्णासाहेब हंगरगेकर, प्राचार्य एम. एस. मणेर, प्रा. विलास जगदाळे, प्रा. अशपाक शेख, प्रा. धनंजय लाेंढे, पद्माकर माेकाशे, दिलीप साेमाजी आदींची उपस्थिती हाेती.
वृक्षलागवड माेहिमेचा आज शुभारंभ
वाशी -येथील नगर पंचायतीच्यावतीने वृक्षलागवड माेहिमेचा शनिवारी शुभारंभ करण्यात येणार आहे. सदरील माेहिमेत शहरातील सर्व लाेकप्रतिनिधी, पदाधिकारी, गैरशासकीय संस्था, वृक्ष लागवड मित्रमंडळे, शाळा, महाविद्यालये, बॅंका तसेच नागरिकांनी सहभाग नाेंदवावा, असे आवाहन नगर पंचायतीचे मुख्याधिकारी गिरीश पंडित यांनी केले आहे.
केमवाडी येथे आराेग्य तपासणी
तुळजापूर - तालुक्यातील केमवाडी येथे बुधवारी आराेग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात माेफत आराेग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरादरम्यान गावातील जवळपास ५५ जणांची आराेग्य तपासणी करण्यात आली. शिबिरासाठी सावरगाव प्राथमिक आराेग्य केंद्रातील सीएचओ स्नेह शिंदे, एएनएम. यु. बी. काळे यांनी परिश्रम घेतले.