उमरगा : तालुक्यातील चिंचोली भुयार येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने ‘कॅच द रेन’ उपक्रमांतर्गत महिलांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी प्रभातफेरी द्वारे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ याबाबत जनजागृती केले. यावेळी ॲड.शीतल चव्हाण, श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर औरादे, वजीर शेख, सरपंच रणजीत गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या विषयावर महिलांची भाषण स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शैलजा बिराजदार, रुक्मिणी शिंदे, सरिता रणखांब यांनी तर निबंध स्पर्धेत पार्वती जाधव, सरिता रणखांब, रुक्मिणी शिंदे यांनी क्रमांक पटकावला. सूत्रसंचालन रुक्मिणी शिंदे यांनी केले, तर आभार सरिता रणखांब यांनी मानले. प्रास्ताविक सूरज चव्हाण यांनी केले. कार्यक्रमासाठी चित्रलेखा पाटील, केशर गायकवाड, प्रमिला अभंगराव, रुक्मिणी शिंदे, सरिता रणखांब आदींनी पुढाकार घेतला.
महिलांसाठी वक्तृत्व, निबंध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:33 AM