परंडा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ‘उमेद’अंतर्गत परंडा तालुक्यातील डोंजा येथे राजमुद्रा प्रभागसंघाची स्थापना मंगळवारी करण्यात आली. या प्रभाग संघाच्या अध्यक्षपदी डोंजा येथील सविता अण्णासाहेब सूर्यवंशी, सचिवपदी भोत्रा येथील लक्ष्मी रामेश्वर शिंदे, कोषाध्यक्षपदी देऊळगाव येथील अनिता धनाजी गााढवे, तर लिपिक म्हणून कोकरवाडी येथील निकिता बाळासाहेब करळे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अभियान व्यवस्थापक माणिक सोनटक्के, तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामसेवक कुचेकर होते. यावेळी देऊळगाव, कौडगाव, भोत्रा, कोकरवाडी आदी गावांतील ग्रामसंघाच्या महिला उपस्थित होत्या. प्रभागसंघ बांधणीसाठी प्रभाग समन्वयक धनंजय चांदणे, प्रेरिका वनिता घोगरे, दीपिका गणगे यांनी परिश्रम घेतले.
फोटो -परंडा तालुक्यातील डोंजा येथे उमेदअंतर्गत राजमुद्रा प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली. यावेळी माणिक सोनटक्के, धनंजय चांदणे, ग्रामसेवक कुचेकर, प्रभागसंघ पदाधिकारी व महिला.