उस्मानाबाद - येथील नाईक मागास समाज सेवा मंडळात नाेकरीस असलेल्या एका कर्मचाऱ्यास सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये, यासाठी सेवापुस्तिका नष्ट करून कार्यमुक्ती प्रमाणपत्रावर बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केली. या प्रकरणी ११ सप्टेंबर रोजी दाेघांविरुद्ध नळदुर्ग पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नळदुर्ग येथील सुरेश माधव नकाते (मृत) हे गावातीलच नाईक मागास समाज सेवा मंडळात नाेकरीस हाेते. त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ मिळू नये, या वाईट उद्देशाने त्यांची सेवापुस्तिका संंस्थेतील वैभव व अमाेल विठ्ठल जाधव या दाेघा बंधूंनी नष्ट केली. तसेच १ डिसेंबर २०२० राेजीच्या कार्यमुक्ती प्रमाणपत्रावर सुरेश नकाते यांची बनावट स्वाक्षरी केली, अशी फिर्याद मृताची पत्नी सुलभा नकाते यांनी ११ सप्टेंबर राेजी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी संबंधित दाेघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलीस अधिक तपास करीत आहेत.