भूम तालुक्यातील पाथरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यंत महत्वाची असलेली एका टाक्याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध झाल्याने केंद्रांतर्गत जवळपास २० गावांमधील महिलांची चांगली सोय झाली आहे. ८ सप्टेंबर रोजी येथे कुटुंब नियोजन शस्रत्रक्रियेचे पहिले शिबिर घेऊन यामध्ये १८ महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. वडगावे यांनीही आरोग्य केंद्रास भेट देऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांची पाहणी केली. या शस्त्रक्रियेसाठी डाॅ. अशोक मुंडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शिनगारे, डाॅ. पोतरे, डाॅ. महेश गिरी, नर्स माधुरी इंगोले, अश्विनी पाटील व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
090921\img-20210908-wa0030.jpg
@ फोटो: यावेळी DHO डाॅ वडगावे यांनीही पाथरुड प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन कुंटूब शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांची पाहणी केली .