शिराढोण (उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील आवाड शिरपुरा येथील शेतकरी गोविंद तुकाराम काळदाते (वय ४५) यांनी सततची नापिकी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नसल्याने राहत्या घरासमोरील झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
या प्रकरणी सतीश तुकाराम काळदाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिराढोण ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी गोविंद गाळदाते यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, सदरील घटनेचा अधिक तपास पोना संजिवन जाधवर हे करीत आहेत.