खामसवाडी (उस्मानाबाद ) : सततची नापिकी, कर्ज यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने गावालगत नदीच्या कडेला एका बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
कळंब तालूक्यातील खामसवाडी येथील शेतकरी पंडित सुबाना सांवत (वय ६५) यांना तीन एकर शेती असून, यावरच कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. दरम्यान, निसर्ग साथ देत नसल्याने यावर उदरनिर्वाह भागवून कर्ज कसे फेडायचे या चिंतेने ते ग्रस्त होते. यातून त्यांनी बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गावालगतच्या नदीजवळील बाभळीच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना असा परिवार आहे. दरम्यान, सर्जेराव सावंत यांनी दिलेल्या माहितीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.