धाराशिव : पीकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान देण्याच्या बाबतीत राज्य सरकारकडून वेळकाढूपणाचे धाेरण स्वीकारले जात असल्याचा आराेप करीत बुधवारी साेनेगाव येथे संतप्त शेतकर्यांनी स्वत:ला जमिनीमध्ये गाढून घेत आंदाेलन केले. या आंदाेलनाचे नेतृत्व जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमाेल जाधव यांनी केले.
पीक विमा भरूनही शेतकर्यांना हक्काची भरपाई मिळाली नाही. एवढेच नाही तर अतिवृष्टीमुळे पिकाचे अताेनात नुकसान झाले. या नुकसानीच्या अनुदानाचा पत्ता नाही. प्रत्येकवेळी सरकारकडून आश्वासन दिले जात आहे. परंतु, आजवर आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. संबंधित प्रश्नाच्या अनुषंगाने वेळाेवेळी आंदाेलनेही केली. मात्र, त्याचाही सरकारवर काहीच परिणाम झाला नाही, असा आराेप करीत बुधवारी धाराशिव तालुक्यातील साेनेगावात संतप्त शेतकर्यांनी स्वत:ला छातीपर्यंत जमिनीत गाढून घेत आंदाेलन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सरकारवर हल्लाबाेल केला. दरम्यान, यानंतरही न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू, अशी भूमिकाही जाधव यांनी आंदाेलनावेळी मांडली.