उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार मोहन पांचाळ व साहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उमरगा यांच्याकडून एस.जी. धुळे यांनी लेखी पत्राद्वारे याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासित केले आहे. याउपरही येत्या १५ दिवसांत कुठलीच कार्यवाही न झाल्यास थेट सोलापूर कार्यालयात टाळेठोक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वेळी शेतकरी सेना तालुकाप्रमुख बलभीम येवते, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे, संदीप चौगुले, शरद पवार, विलास भगत, रणधीर पवार, संदीप जगताप, गोपाळ जाधव, संजय हुळीकडे, तुकाराम जाधव, श्रावण इंगळे, अंबादास हिराजी ममाळे, दत्ता डोंगरे, खयूम चाकुरे, शेखर पाटील, प्रशांत गायकवाड, जितेंद्र जाधव, दत्ता माने, रणजीत पाटील, ज्ञानेश्वर कदम, अशोक सुरवसे, गजेंद्र येवते, दत्तात्रय औरादे, कालिदास कदम, विनोद गायकवाड, संतोष ढोले, अनंत पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
पाॅईंटर..
विठ्ठलसाई कारखान्याने या आंदोलनाची दखल घेऊन उर्वरित बिले अदा करण्यास सुरुवात केल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.