तालुक्यातील दस्तापूर येथील नागरिकांना १९६५ साली तत्कालीन उपजिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भूमिहीन शेतमजूर योजनेअंतर्गत जागा व घरे बांधून देण्यात आली आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्या लाभार्थ्यांना मालकी हक्क प्रदान करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना अडचणी येत आहेत. तसेच भूमिहिनांना जमीन देण्यासाठी गट नंबर ९८ मधील २५ आर. जमीन संपादित करण्यात आली आहे. परंतु, या जमिनीची मोजणी झालेली नाही. सदर जमिनीची मोजणी करण्याबाबत तहसीलदारांनी दोन महिन्यांपूर्वी आदेश दिले आहेत. मात्र, अद्यापही त्यानुसार कार्यवाही करण्यात आली नाही. तत्काळ जमिनीची मोजणी करण्यात यावी, लाभार्थ्यांना मालकी हक्क प्रमाणपत्र द्यावे, विधवा, परितक्त्या महिला, दिव्यांग व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा, यासाठी फकिरा ब्रिगेड व ग्रामस्थांनी बुधवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
तिसऱ्या ही दिवशी उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:35 AM