धाराशिव : दराेड्यासह वेगवेगळ्या गुन्ह्यात न्यायालयास हवा असलेला आराेपी आठ वर्षांपासून वेष बदलून गुंगारा देत हाेता. एवढेच नाही तर मुलगा मयत झाल्याचे प्रतिज्ञापत्र वडिलांनी न्यायालयात दिले हाेते. मात्र, पाेलिस यंत्रणेच्या मनात पाल चुकचुकल्याने तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला हाेता. गापनीय माहितीच्या आधारे मंगळवारी त्यास डिकसळ (ता. कळंब) शिवारातून बेड्या ठाेकल्या. न्यायालयासमाेर उभे केले असता, त्याची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली.
वाशी तालुक्यातील पिंपळगाव (क) येथील रहिवासी बबन आबा शिंदे (ह.मु. कळंब) हा दराेड्यासह वेगवेगळ्या गुन्ह्यात न्यायालयास हवा हाेता. मात्र, मागील आठ वर्षांपासून ताे वेष बदलून गुंगारा देत हाेता. एकीकडे त्याचा शाेध सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या वडिलांनी आपला मुलगा मयत झाला आहे, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले. यानुषंगाने त्याचा पाेलिसांच्या वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून शाेध घेवूनही तपास लागला नाही. यानंतर न्यायालयाने आराेपीचा शाेध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्याचे जिल्हा पाेलीस अधीक्षकांना दिले हाेते. त्यानुसार स्थागुशाचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके यांच्या नेतृत्वातील पथक १ एप्रिल राेजी कळंब तालुक्यात शाेध घेत हाेते. याचवेळी ताे डिकसळ शिवारात असल्याची गाेपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अचानक छापा टाकला असता, ताे मिळून आला. न्यायालयासमाेर उभे केले असता, त्याची न्यायालयीन काेठडीत रवानगी केली.
पथक हाेते मागावर...न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नेमण्यात आले हाेते. या पथकाच्या माध्यमातून त्याचा शाेध सुरू हाेता. अखेर आठ वर्षे वेष बदलून गुंगारा देणारा आराेपी बबन शिंदे हा पाेलिसांच्या जाळ्यात सापडला.