अणदूर : तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथे तीन टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यात ईटकळ उपकेंद्रांतर्गत असणाऱ्या गावातील ४२१ नागरिकांनी ही लस टोचून घेतली.
ईटकळ हे पाच हजार लोकसंख्येचे गाव असून, गतवर्षी गावात कोरोना व सारीच्या आजाराने काही रुग्ण दगावले होते. याची गंभीर दखल घेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ईटकळ ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने गावात विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे या गावात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. प्रशासनाच्यावतीने गावात तीन टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले. यात ईटकळ, बाभळगाव, केशेगाव, हिप्परगा, खानापूर, केरुर व शिरगापुर येथील ४२१ लोकांनी लस टोचून घेतली. यावेळी अणदूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलिंग शेटे, सरपंच राजश्री बागडे, उपसरपंच फिरोज मुजावर, ग्रामविकास अधिकारी संजय माशाळे, डॉ. जगदीश शिंदे, माजी सरपंच अरविंद पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका एस. डी. दलभंजन, राहुल बागडे, केंद्रप्रमुख नामदेव सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यासाठी आरोग्य पर्यवेक्षक के. एम. पाटील, पोलिस पाटील विनोद सलगरे, परिचारिका यू. एम. कळके, मृणालिनी कांबळे, संतोष सुरवसे, आशा कार्यकर्ती लक्ष्मी वाघमारे, वैशाली भोसले, अंगणवाडी सेविका सुरेखा डावरे, वेणुबाई लकडे, अर्चना झाडपिडे, शोभा माळी, ज्योती बागडे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन लकडे, सुनील होगले, किरण मुळे, चंद्रकांत लोहार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला.
फोटो--- तुळजापूर तालुक्यातील ईटकळ येथे कोरोना प्रतिबंधक लस देत असताना वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवलिंग शेटे.