रोटरी क्लब ऑफ सोलापूर, सिद्धगंगा हाॅस्पिटल सोलापूर व लाल बहाद्दूर शास्री विद्यालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते व रोटरी क्लबच्या अध्यक्षा आरती बंडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबच्या सेक्रेटरी रंजना सिरसाठ, जि. प. सदस्य प्रकाश चव्हाण, माजी जि. प. अध्यक्ष शिवदास कांबळे, विजय जाधव, डाॅ. संजय मंठाळे, पं.स. सदस्या शीला गायकवाड उपस्थित होते.
डाॅ. सिद्रामप्पा खजुरे, उत्तमराव लोमटे, महांतेश पाटील, प्रा. अंकुश कदम, लक्ष्मण शिंदे, लखन जाधव, गोपाळ सुरवसे, सातलिंग स्वामी, दत्ता राजमाने, अशोक राजमाने, सुरेश राजमाने, मुख्याध्यापक रवींद्र उपासे, मुख्याध्यापक विनायक राठोड, मारुती बनसोडे, भैरवनाथ कानडे, गणेश खराडे, योगेश खराडे, वल्लभ खराडे, अंकुश अंगुले, महादेव पाटील, सुधाकर सगट, मन्सुर शेख, राहुल राजमाने, सय्यद, बाबासाहेब आलुरे, प्रदीप कदम, मनोहर घोडके आदी उपस्थित होते. या शिबिरात सहाशे रुग्णांनी फायदा घेतला. सूत्रसंचालन प्रदीप कदम यांनी तर आभार मनोहर घोडके यांनी मानले.