तुळजापूर: शुक्रवार दिनांक 26 प्रजासत्ताक दिनानिमित्त मंदिर संस्थांननी तुळजाभवानीस केसरी रंगाचे महावस्त्र नेसवुन अलंकार महापूजा मांडली होती तर तिरंगी रंगाच्या फुलांचा मोठा हार घालण्यात आला होता. देवीसिंहासन विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजविले होते. या सिंहासनाच्या पाठीमागे तिरंग्यापट्ट्या लावून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधले होते. शुक्रवार राष्ट्रीय सुट्टीचा दिवस यामुळे तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक शहरात दाखल झाले आहेत.
यामुळे पहाटे चार पासूनच मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होती तसेच अभिषेक पूजानंतर या गर्दीत मोठे वाढ झाली. सततच्या तीन सुट्ट्यामुळे तुळजाभवानी मंदिरात गर्दी वाढणार असे पुजाऱ्यांच्यावतीने सांगण्यात येत आहे. यासाठी मंदिर संस्थांननी सर्व तो तयारी करून भाविकांना चांगल्या प्रकारे सेवा कशी देण्यात येईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. या आगळ्यावेगळ्या पूजेचे भाविकाबरोबर शहरवासियातुनही आनंद व्यक्त होत आहे.