गुरुवारी नगराध्यक्ष अनिता अंबर यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगरसेवकांची बैठक पालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी पक्षाच्या आदेशाप्रमाणे प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक सहदेव गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुरकर, कार्यालयीन अधीक्षक उमाकांत देशपांडे, मावळते उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नूतन उपनगराध्यक्ष गायकवाड यांचा मावळते उपनगराध्यक्ष बेंडकाळे यांनी सत्कार करून गायकवाड यांच्याकडे पदभार सोपवला.
चौकट.....
मुरुम नगर परिषद गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. येथील नगराध्यक्षपद महिलेसाठी आरक्षित असून, या पदावर काँग्रेसच्या अनिता सुधीर अंबर कार्यरत आहेत. उपनगराध्यक्षपद मात्र आता तिसऱ्यांदा बदलण्यात आले आहे. सुरुवातीला उपनगराध्यक्षपदी संतोष चिलोबा यांची निवड करण्यात आली होती. दोन वर्षांनंतर श्रीकांत बेडकाळे यांची निवड झाली. आता सहदेव गायकवाड यांना काँग्रेसने उपनगराध्यक्षपदाची संधी दिली आहे.
फोटोओळी
मुरुम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सहदेव गायकवाड यांची निवड झाल्यानंतर मावळते उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांनी सत्कार करून गायकवाड यांना पदभार दिला.