कळंब : येथील नगर परिषदेच्या प्रभारी उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
कळंब नगरपालिकेचे उपाध्यक्ष संजय मुंदडा यांनी ९ मार्च रोजी सव्वादोन महिन्यांची रजा दिल्यानंतर नगराध्यक्ष मुंडे यांनी सफुरा काझी यांना पंधरा दिवसांसाठी पदभार दिला होता. सदर पदभार कालावधी २५ मार्च रोजी संपुष्टात आल्यानंतर नगराध्यक्ष यांनी पुढील पंधरा दिवसांसाठी म्हणजे ९ एप्रिलपर्यंत नगरसेवक सुभाष सूर्यभान पवार यांना उपनगराध्यक्षपदाचा पदभार सोपवला होता. आता पवार यांची मुदत संपल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर गायकवाड यांच्याकडे सोमवारी पुढील पंधरा दिवसांसाठी नगराध्यक्षा मुंडे यांनी उपाध्यक्षपदाचा कार्यभार सोपविला.
या निवडीनंतर गायकवाड यांचा नगराध्यक्षा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, गटनेते लक्ष्मण कापसे, सागर मुंडे, शकील काझी, महेश पुरी, बप्पा चोंदे आदींनी त्यांचा सत्कार केला.
कॅप्शन - कळंब न.प.च्या प्रभारी उपनगराध्यक्षपदी अमर गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर शहर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष बप्पा चोंदे यांनी त्यांचा सत्कार केला.