सिलिंडर सबसिडी
जुलै २०२० - ६०९ - ३.६९
ऑगस्ट - ६०९ - ४.१९
सप्टेंबर - ६१० - ५.१९
ऑक्टोबर - ६१० - ५.१९
नोव्हेंबर - ६१० - ५.१९
डिसेंबर -६६० - ५.१९
डिसेंबर - ७१० - ५.१९
जानेवारी २०२१ ७१० - ५.१९
फेब्रुवारी ७३५ -५.१९
मार्च ८३५ - ५.१९
एप्रिल - ८२५ - ५.१९
मे - ८२५ - ५.१९
जून - ८२५. - ५.१९
जुलै २०२१ - ८५१ - ५.१९
शहरातही चुली पेटू लागल्या
शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना चुली पेटवाव्या लागत नव्हत्या. मात्र, सिलिंडरच्या दरामध्ये झालेल्या घसघशीत वाढीमुळे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी, तसेच गरज पडली तर जेवण करण्यासाठी चूल पेटवायलाच लागते. महागाई नियंत्रणात येईपर्यंत चुलीचाच आधार घ्यावा लागत आहे.
सुनीता वाघमारे, गृहिणी
कोरोनाने हाताला काम मिळत नव्हते. गेले दीड वर्ष आम्ही काटकसरीने राहतोय. सिलिंडर गॅस आता नकोसा वाटू लागला आहे. त्यामुळे चूल पेटविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जरी शहरात राहत असलो तरी सर्वसामान्य आहोत. त्यामुळे चुलीवर जेवण करावे लागते.
नौशादबी शेख, गृहिणी