मागील दोन वर्षांपासून कार्यालयाने शिधापत्रिका जमा करून ऑनलाइन नोंदणी करून घेतली आहे; परंतु अद्यापपर्यंत ‘स्मार्टकार्ड’ शिधापत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे इतर खाजगी व शालेय कामासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिधापत्रिकेच्या वर्गवारीप्रमाणे मध्यमवर्गीयांसाठी ‘केशरी’ शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या असून, सद्य:स्थितीला केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशनचा कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याने हे लाभार्थी दुकानांकडे जात नाही; परंतु आपल्या कार्यालयातून सलग दोन महिने जर रेशन दुकानदाराकडील मशीनवर ठसा लागला नाही, तर अशा लाभार्थ्यांची नावे ऑनलाइन लिस्टमधून वगळली जाण्याची भीती केशरी शिधापत्रिकाधारकांना वाटत आहे. त्यामुळे आपण याप्रकरणी योग्य निर्णय घेऊन शिधापत्रिकाधारकांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी समितीचे मार्गदर्शक बाबासाहेब जानराव, रणजित गायकवाड, जागृती फाउंडेशनचे विजय बनसोडे, सोमनाथ यशवंत गायकवाड, अदिनाथ सरवदे, मुकेश मोठे, महादेव एडके, पेंटर युनियनचे बाबासाहेब कांबळे, अतुल लष्करे यांची उपस्थिती होती.
लाभार्थ्यांंना ‘स्मार्टकार्ड’ शिधापत्रिका द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:32 AM