(फोटो : राहूल डोके १७)
पारगाव : जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत परितक्त्या महिला, दिव्यांगांना शंभर टक्के अनुदानावर शेळी गटांचे वाटप येथे करण्यात आले.
जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे यांच्या वतीने वाशी तालुक्यामध्ये परितक्त्या महिलांना प्रत्येकी दोन शेळी व दिव्यांगांना दोन शेळ्या या पध्दतीने वाशी तालुक्यामध्ये २५ परितक्त्या महिला व एका दिव्यांगास या योजनेचा लाभ देण्यात आला. यात वाशी पंचायत समिती पारगाव गणांमध्ये दहा परितक्त्या महिला व एका दिव्यांगाचा समावेश आहे. यावेळी शिवसेनेचे वाशी उपतालुकाप्रमुख विकास तळेकर, तालुका पशुसंवर्धन अधिकारी एस. एस. अलमवार, पारगावचे पशुधन विकास अधिकारी ज्ञानेश्वर बाबर, पारा येथील डॉ. तांबडे, इंदापूर येथील डॉ. खुणे, मांडवा येथील डॉ. दराडे, विमा प्रतिनिधी सिद्धेश्वर सोनवणे आदी उपस्थित होते.