यावेळी भवानीनगर परिसर, पोस्ट ऑफिस परिसरामध्ये नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्तीच्या कामाला निधी प्राप्त झाला आहे. सोनारी पंचक्रोशीतील कुंभार गल्ली ते सुरवसे गल्ली, मारुती मंदिर ते खंडोबा मंदिर व तसेच मारुती मंदिर ते खंडोबा मंदिर याअंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी सरपंच नवनाथ जगताप, सोनारी आखाडा गुरू गादीचे महंत योगी श्यामनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी काळभैरवनाथ मंदिराचे मुख्य पुजारी संजय महाराज, सरपंच दीपक दुबळे, उपसरपंच भाऊसाहेब मांडवे, ग्रामपंचायत सदस्य संभाजी सुरवसे, अंगद फरतडे, राम पाटील, भाऊसाहेब पाटील, प्रकाश ईटकर, गणेश हांगे, भारत ईटकर, गोकुळ ईटकर, संतोष सुरवसे, राम ईटकर, सोमनाथ आणवणे, बिभीषण भोसले, ईश्वर मोरे, बंटी गुळमिरे, नाना मांडवे, आदुंबर गाडे, शिवाजी नलवडे, तात्या ढमे, अंगद भोसले, अण्णा दुबळे, संभाजी नलवडे, अण्णा राऊत, अशोक गुळमिरे, अतिष देशमुख, बापू सर्जेराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
150821\4327psx_20210815_172117.jpg
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ६५ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.