उमरगा : गोंधळी समाजसेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती इगवे, तालुकाध्यक्ष महादेव उबाळे यांच्या उपस्थितीत गुंजोटी येथे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष दत्ता पाचंगे, उपाध्यक्ष सुभाष पाचंगे, कार्याध्यक्ष बालाजी भिसे, युवा अध्यक्ष रमेश भिसे, सचिव माया पाचंगे, सदस्य दिलीप भिसे, शिवाजी भिसे यांची निवड करण्यात आली. यावेळी विमल भिसे, आविता पाचंगे, नगुराबाई पाचंगे, रुक्मिणी भिसे, प्रयागबाई पाचंगे, मुद्रिकाबाई भिसे, रोहित पाचंगे, प्रथमेश भिसे, आदित्य पाचंगे यांची उपस्थिती होती.
आरोग्य केंद्रास जिल्हास्तरीय कायाकल्प मूल्यांकन पथकाची भेट
(फोटो : गुणवंत जाधवर २१)
उमरगा : तालुक्यातील नाईचाकूर प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हास्तरीय कायाकल्प मूल्यांकन पथकाने शनिवारी भेट दिली. राज्य शासनाच्या वतीने आरोग्य सेवेत चांगले काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना बक्षीस दिले जातेे. कायाकल्प योजनेत आरोग्य केंद्रांची निवड करताना काही निकष आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे सुशोभीकरण व बळकटीकरण, रुग्णालयातील सांडपाण्याचे व्यवस्थापन व निरोगी वातावरणनिर्मिती, रुग्णालयातील जैविक कचरा, सुक्या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे आदींची या पथकाने पाहणी केली. यावेळी पथक प्रमुख डॉ. एम. आर. पांचाळ, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष आहेर, के. डी. गवळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, डॉ. सुप्रिया टीके, डॉ. संतोष कांबळे, डॉ. कावळे विठ्ठल, डॉ. आत्माराम जामदार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ विकास सूर्यवंशी, संजय शिंदे, संभाजी भांगे, अमृता पाटील, आरोग्य सेविका नंदा गोस्वामी व सर्व आरोग्यसेवक, आरोग्यसेविका गटप्रवर्तक
आदी उपस्थित होते.
उमरगा
भारतीय बौद्ध महासभा उमरगा तालुका यांच्या वतीने शनिवारी दि.२० रोजी उमरगा शहरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सोनबा येलवे नावाने पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळ्यावर पाण्यासाठी संघर्ष केला आणि इथल्या बहुजनांसाठी चवदार तळे खुले केले यातून हक्क आणि अधिकार मिळवून दिला.
या क्रांती दिनाचे औचित्य साधून ॲड. महादेव ढोणे यांच्या आर्थिक सहकार्यातून,भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उमरगा शहरातील नगरपरिषद समोरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सोनबा येलवे नावाने पाणपोई उभारण्यात आली.या पाणपोईचे उद्घाटन माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे हे होते.यावेळी संस्थेचे तालुका पदाधिकारी अश्विनीताई कांबळे, कविता सुरवसे, रंजना सुरवसे, प्रभाकर गायकवाड,जीवनराव सूर्यवंशी, अविनाश भालेराव,राजेंद्र सूर्यवंशी ,किरण कांबळे, शेखर कांबळे ,,समता सैनिक दलाचे सर्व सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय कांबळे यांनी केले तर सर्वांचे आभार तालुकाप्रमुख निखिल गायकवाड यांनी मानले.